श्वेतकमल

फुलांच्या गंधकोषी

Nelumbo nucifera ‘Alba’ श्वेतकमल

फुलं म्हणजे जीवनसौंदर्य, ‘ईश्वरा’चा एक अद्भुत आविष्कार ! फुलांचा रंग, त्यांचा आकार, त्यांचा गंध, त्यांचा स्पर्श, त्यांचे रूप, या साऱ्याच गोष्टी किती अद्भुत असतात ! फुलांच्या या विविधतेकडे डोळे उघडे ठेवून पाहिले तर ‘ईश्वरा’च्या निर्मिती-कौशल्याबद्दल अचंबा वाटल्याशिवाय राहात नाही. म्हणूनच आपल्या अस्तित्वाने आसमंत प्रसन्न करून टाकणारी फुलं मानवी जीवनाचा, सण-समारंभांचा, उत्सवांचा एक अविभाज्य भाग बनली आहेत.

परंतु फुलांमध्ये यापेक्षाही अनोखे असे काहीतरी असते; ती विलक्षण संवेदनशील असतात; ती अत्यंत ग्रहणशील असतात; ती शक्तीची वाहक असतात; ती ‘ईश्वरा’च्या विविध गुणांची अभिव्यक्ती करतात, त्यांना त्यांच्या रूपगुणवैशिष्ट्यांनुसार काही सखोल ‘आध्यात्मिक अर्थ’ असतो,

  • फुलाचे परिचित नाव – श्वेतकमल
  • फुलाचे शास्त्रीय नाव – Nelumbo nucifera ‘Alba’
  • श्रीमाताजींनी फुलाला दिलेले नाव आणि आध्यात्मिक अर्थ – अदिती (Aditi-the Divine Consciousness)
  • आध्यात्मिक अर्थाचे स्पष्टीकरण : – सर्व काही त्या ‘परम देवते’कडून निर्माण झाले आहे. त्या ‘परम’ आणि ‘मूळ महाशक्ती’पासून उदयास आले आहे. सर्व काही तिच्यामुळेच जगते… सर्व तिच्यामध्येच जगतात… ती देखील सर्वांमध्ये निवास करते. सर्व प्रज्ञा आणि ज्ञान म्हणजे तिची प्रज्ञा व ज्ञान असते; सर्व शक्ती ही तिची शक्ती असते; सर्व संकल्प आणि शक्ती ही तिचा संकल्प आणि शक्ती असते; सर्व कार्य हे तिचे कार्य असते; सर्व गतिविधी या तिच्या गतिविधी असतात. सर्व जीवमात्र हे तिच्या अस्तित्वशक्तीचे अंशभाग असतात.

श्रीअरविंद
[CWSA 10-11 : 1339]

(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)

Loading

%d bloggers like this: