निर्मळ झरा

भगवान बुद्धांचे धम्मचक्रप्रवर्तन सुरु होतं. त्यासाठी पायी फिरणं असायचं. प्रत्येक माणसात दडलेलं हृदय हेच त्यांचे तीर्थक्षेत्र असायचं आणि त्यासाठी सुरु असलेलं प्रवर्तन ही यात्रा अनेक दिवस सुरु होती. एकदा एका अरण्यातून चालले होते. वाटेतला एक झरा ओलांडून तीन मैल पुढे आले नि त्यांना तहान लागली. ते एका झाडाखाली विसावले, शिष्य आनंदाला म्हणाले, ‘आपण जो झरा मागे सोडला त्यातूनच मला पाणी घेऊन ये’ आनंद कळशी घेऊन मागे निघाला. वाटेत त्याला बैलगाड्या येतांना दिसल्या. झऱ्यातून बैलगाड्या आल्यानं सारं पाणी गढूळ झालं असेल आणि तेच पाणी मी भगवानांना असं कसं देणार? या विचाराने आनंद रिकाम्या हाती परतला. 

परत आल्यावर आनंद भगवान बुद्धांना म्हणाला, ‘मी दुसऱ्या झऱ्याचं पाणी आणतो.’ भगवान म्हणाले. ‘मला त्याच झऱ्यातलं पाणी हवंय. परत जा.’ आनंद पुन्हा झऱ्याजवळ पोहोचला. काळ गेला होता. बरीचशी घाण तळाशी बसली होती. पालापाचोळा वाहून गेला होता. कोणीही प्रयत्न केलेले नव्हते. सूत्र लक्षात आलं होतं. आनंद झऱ्याकाठी बसला. फक्त प्रवाहाकडे पाहात होता. पाणी स्फटीकासारखं स्वच्छ झालं होतं. त्यानं कळशी पाण्याने भरली आणि नाचतच बुद्धांजवळ आला. त्यांच्या पायावर लोळण घेतली. म्हणाला, ‘आयुष्यभर मनाशी मी हाच खेळ मांडला होता. प्रयत्नांचे शिखर रचले… आता मी पाण्यात उतरणार नाही… नुसता झाडाखाली बसून राहीन… केवळ पाहीन.’ 

आनंदला बुद्धांच्या सान्नीध्यात हे रहस्य उलगडलं… आम्ही मात्र पाणी अधिकच गढूळ करतो…

निसर्ग प्रदूषित करतो.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: