संतुष्ट आणि समाधानी

एका सुफी संताची कथा आहे. त्याचा मृत्यू जवळ होता. एका झोपडीत राहायचा तो. त्याच्या भक्तांनी त्याला एक शेत आणि उद्यान दिलेलं होते. तो कायम म्हणत असे की, ‘मी या जगातून जाईन त्यापूर्वी जिवंत असताना मला झोपडी पुरेशी होती, नंतर या झोपडीचा काय उपयोग ? एक करा, या झोपडीतच माझं दफन करा.” त्यानं उद्यानाच्या दारावर एक पाटी अडकवली, “जो पूर्ण संतुष्ट आहे, त्याला हे उद्यान भेट देण्याची माझी इच्छा आहे.’’ कठीण अट होती. 

“जो पूर्ण संतुष्ट आहे, त्याला हे उद्यान भेट देण्याची माझी इच्छा आहे.’’

अनेक आले नि परतले. राज्यातल्या सम्राटपर्यंत हा प्रकार पोहोचला. मनात म्हणाला, या फकिरानं इतरांना परतवून लावलं होते. माझ्याशी तो तसं वागणार नाही. मला काय कमी आहे, जे हवं ते सारं माझ्याजवळ आहे – पद, प्रतिष्ठा, अधिकार, दरारा, सम्राट पोहोचला आणि फकिराला म्हणाला, मी आलोय.

फकीर तात्काळ उत्तरला, “तू संतुष्ट असशील तर येथे आलास तरी कशासाठी? मागणी तरी कशाची? हे उद्यान त्यालाच मिळेल, जो येथे येणार नाही, याचना करणार नाही.”

Loading

%d bloggers like this: