ABOUT

श्रीनिवास गर्गे

माझ्या या ऐसपैस या ब्लॉगवर सर्वांचे स्वागत आहे.

वास्तविक मी लेखक नाही, लेखकराव तर नाहीच नाही. मला काही नवीन सुचले, सांगावेसे वाटले तर माझे विचार मी माझ्या या ब्लॉगवर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. 

लहानपणापासून वाचण्याची मला आवड आहे. कोणत्याही विषयावर वाचायला मला आवडते. मानववंश शास्त्र, भाषा शास्त्र, व्यवस्थापन, इतिहास, खगोलशास्त्र अशा कोणत्याही प्रकारची पुस्तके मी वाचतो. यामुळेच की काय परंतु माझे विचार मांडतांना, शब्दांची फारशी मनधरणी न करता मी लिहू शकतो. 

शिक्षणाने मेकॅनीकल इंजीनिअरींग, व्यवसायाने मी ग्राफीक डिझायनर आहे. गेल्या १५ वर्षांचा डिजीटल तसेच प्रिंटींग क्षेत्राचा अनुभव आहे. पुस्तक प्रकाशन, व्यावसायीक फोटोग्राफी, कॅटलॉग डिझाईन, पॅकेजींग यासारख्या उत्पादन क्षेत्रात व्यवस्थापनाचा अनुभव आहे. नाही म्हणायला सुरुवातीच्या काळात संगणक विक्रीचा अनुभवदेखील पाठीशी आहे.

फोटोग्राफी, खगोलशास्त्र, गिर्यारोहण ही माझी आवडती क्षेत्रे, ललित कथा, भाषाशास्त्राशी निगडीत लेख, ऐतिहासिक घटना, कविता तसेच तंत्रज्ञान विषयक लेखांचे नियमित लेखन मी करीत असतो. यापूर्वी अनेक लेख वर्तमानपत्रांतून, दिवाळीअंकांमधून प्रसिद्ध झालेले आहे. त्यातील काही लेख अथवा कविता या ब्लॉगवर मी पुनःप्रकाशित केले आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने विविध देशांना दिलेल्या भेटी शब्दबद्ध करून या ब्लॉगवर मी टाकतो आहे.

माझी ओळख या ब्लॅागवर लिहीलेल्या माझ्या लिखाणातून होत राहील अशी अपेक्षा. काही प्रश्र्न असतील अथवा काही चर्चा कराविशी वाटली तर या ब्लॉगवर इतरत्र माझी संपर्कसूत्रे आहेतच. या ब्लॉगवर काही आवडले असेल अथवा नसेल तरीदेखील माझ्याशी नक्की संपर्क साधा. 

माझे लिखाण आवडले असेल तर लेखाखाली व्यक्त व्हा, आपल्या मित्रमंडळींबरोबर ब्लॉगची लिंक सामाईक करा. आपला ईमेल (विरोपपत्ता) माझ्या ब्लॉगवर नोंदवून ब्लॉगची सदस्यता ग्रहण करा, यामुळे माझे नविन लेख प्रकाशित केल्याची सूचना ईमेलवर मिळत राहील. 

दिसा माजी काही तरी ते लिहावे | प्रसंगी अखंडीत वाचीत जावे || जे जे आपणासी ठावे | ते ते इतरांसी शिकवावे | शहाणे करुन सोडावे सकल जन || – श्री समर्थ रामदास स्वामी

श्रीनिवास

Loading

%d bloggers like this: