HOME

माझे लिखाण

  • गुरूच्या बर्फाळ चंद्रावर युरोपा क्लिपरची स्वारी

  • कांचनवृक्ष

  • पिचकारी वृक्ष – आफ्रिकन ट्युलिप

  • समुद्राचे पाणी पिणारा ‘अगस्ती’ तारा

विस्तीर्ण किंवा प्रशस्त या अर्थाने ‘ऐसपैस’ हा शब्द अनेकदा वापरला जातो. मात्र माझ्या या ब्लॅागला हे नाव देतांना वेगळाच अर्थ मला अभिप्रेत आहे. 

ज्ञानेश्वरांनी एका पाषाणी खांबाला टेकून ज्ञानेश्वरी लिहीली.  “चैतन्याच्या बेंबीला भिडणारा अवकाशाचा पारदर्शक पसारा” असे या पैस खांबाचे अद्भुत-वर्णन दुर्गा भागवतांनी ललित लेखातून केले आहे. 

याच लेखात पुढे दुर्गा आत्या म्हणते तसा हा पाषाण एक साधा टेकू आहे. या पैसाला पाठ टेकवून माऊलीला साध्या सोप्या भाषेत ज्ञानेश्वरी स्फुरण पावली. 

अघळपघळ लिहीलेल्या माझ्या या प्रायोगिक लेखनाला या आधुनिक ब्लॅागचा टेकू असाच उपयोगी ठरावा, ही माऊलीचरणी प्रार्थना. ऐसा हा ठरो पैस (टेकू) माझिया लेखांचा…. आणि म्हणून हा ‘ऐसपैस’ प्रयत्न.

Loading